‘बेनेली’ची २५० सीसी बाईक लाँच

beneli
पुणे – २५०सीसीच्या बाईक निर्मितीत ‘बेनेली’ या जगप्रसिद्ध इटालियन सुपरबाईक कंपनीने पदार्पण केले असून, बेनेलीच्या ‘टीएनटी २५’ या बाईकचे डीएसकेने पुण्यात अनावरण करण्यात आले.

डीएसके मोटोव्हिलचे अध्यक्ष शिरीष कुलकर्णी आणि मार्केटिंग प्रमुख शिवा रे यावेळी उपस्थित होते. यावेळी कुलकर्णी म्हणाले, यानिमित्ताने ‘बेनेली’ २५० सीसीच्या विभागात प्रवेश करीत असून लिक्विड कूल सिंगल सिलेंडर, ४ स्ट्रोक डीओएचसी इंजीन, चाकाच्या पुढील बाजूस २८० मिमी पेटल डिस्क, जी ४ पिस्टन कॅलिपर, मागच्या बाजूस २४० मिमी सिंगल डबल पिस्टन कॅलिपर, १७ लीटर इंधन टाकीची क्षमता आहे. याशिवाय भारतीय रस्त्यावर चालविता येईल, अशी याची निर्मिती करण्यात आली आहे.

Leave a Comment