आता मोबाईल बँकिंग एटीएममधून

mobile-banking
मुंबई – ३१ मार्च २०१६ पर्यंत एटीएममधून मोबाईल बँकिंग नोंदणी करण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकने प्रयत्न चालू केले असून यासाठी आरबीआयने बँकांना एटीएममध्ये आवश्यक असणारे बदल करण्यास सांगितले आहे.

मोबाईलचा प्रसार भारतामध्ये मोठय़ा प्रमाणावर होत असून जास्तीत जास्त व्यवहार मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून झाल्यास ग्राहकांचा मोठय़ा प्रमाणावर वेळ वाचणार आहे. बँकांना मोबाईल बँकिंग सेवेच्या माध्यामातून आपल्या सेवेचा विस्तार करणे यामुळे शक्य होणार आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.

एटीएमच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग नोंदणी करण्याची प्रणाली नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने विकसित केली आहे. लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. ह्या प्रणालीवर सध्या काही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.

आरबीआयने बँकांना मोबाईल बँकिंग नोंदणी करण्याची सुविधा देण्यासह इंटरनेट बँकिंग, आयवीआर, फोन बँकिंग या सेवा देण्याबाबत सांगितले आहे. देशात मोबाईलचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत आहे. यामध्ये आणखी वाढच होत जाणार आहे. बँक आपले मोबाईल चॅनेल विस्तृत करून सेवा वाढवू शकतात. यामुळे ग्राहकांना आणि बँकांचा मोठय़ा प्रमाणात वेळ वाचेल. तसेच भारतामध्ये कॅशलेस व्यवहार वाढल्याने काळा पैसा रोखण्यास मदत होईल.

Leave a Comment