
अॅपलने स्पेशल उत्पादने विकसित करण्यासाठी तैवानच्या लॉग्टन येथे गुप्त प्रयोगशाळा सुरू केली असून सध्या तेथे ५० इंजिनिअर्स आणि अन्य कर्मचारी काम करत असल्याचे ब्ल्यूमबर्गने म्हटले आहे. येथे नवीन प्रकारचे डिस्प्ले तंत्रज्ञान तयार करण्याचे काम सुरू असून हे डिस्प्ले आयफोन आणि आयपॅडसाठी बनविले जात आहेत. ही प्रयोगशाळा याच वर्षात सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे.
अॅपलची तैवानमध्ये स्पेशल प्रॉडक्शन लॅब?
अॅपलला त्यांची भविष्यातील उत्पादने सध्याच्या फोन, आयपॅडपेक्षा अधिक सडपातळ, हलकी आणि चमकदार तसेच कमी उर्जा वापरणारी हवी आहेत. त्यासाठी लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले बरोबरच ऑरगॅनिक एलईडी वरही काम सुरू आहे. आयफोन आयपॅडचे वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी डिस्प्ले अधिक सडपातळ बनवावा लागणार आहे. तसेच शार्प कॉर्प, जपान डस्प्ले इंक, सॅमसंग इलेक्ट्राॅनिक्स व एलडी डिस्प्लेवरील अवलंबित्व कमी करण्याचा व या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याचा अॅपलचा प्रयत्न असल्याचेही सांगितले जात आहे.
