पुढच्या डिसेंबरअखेर १०० वायफाय स्टेशन्स – सुंदर पिचाई

sundar
दिल्ली – गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारतात डिसेंबर २०१६ अखेर गुगल १०० वायफाय स्टेशन्स सेवा देईल अशी घोषणा केली आहे. बुधवारी दिल्लीत गुगल इंडिया इव्हेंटमध्ये ते बोलत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यावेळी गुगलने भारतात ४०० स्टेशनवर वायफाय सेवा देणार असल्याचे जाहीर केले होते. पिचाई यांनी दिल्लीत केलेली घोषणा हा त्याचाच एक भाग आहे.

सुंदर त्यांच्या पूर्ण टीमसह भारतात आले आहेत. इंटरनेट सवेबाबत ते म्हणाले आम्ही इंटरनेट साथी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर गावात सुरू केला आहे पुढील तीन वर्षात तो ३ लाख गावांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. कमी खर्चात कनेक्टीव्हीटी देणारा गुगलचा प्रोजेक्ट लून भारतात आणण्याची तयारीही सुरू आहे. २०१८ पर्यंत २३ भाषातील ५० कोटी ऑनलाईन युजर भारतात असतील व ३० टक्के युजर टूजी कनेक्टीव्हीटीने जोडलेले असतील. भारताने मला आणि गुगलला खूप कांही दिले आहे आणि आता माझी परतफेडीची वेळ आली आहे. भारतातील ऑनलाईन सेवांसाठी सवतोपरी सहाय्य केले जाईल असे जाहीर करतानाच त्यांनी हैद्राबाद येथे गुगल कँपस सुरू करत असल्याचेही सांगितले.

Leave a Comment