
वॉशिंग्टन : आपल्या व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने केली असून गेल्या ९ वर्षांत पहिल्यांदाच ‘फेडरल’कडून व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
९ वर्षानंतर प्रथमच फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ
व्याजदारात वाढ करण्याचा निर्णय गेल्या ९ वर्षांतील विक्रमी पडझडीनंतर घेण्यात आल्याचे अर्थतज्ञांकडून सांगण्यात आल्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हने आपल्या व्याजदरांमध्ये ०.२५ टक्के वाढ केली असून, हा व्याजदर आता ०.५ टक्क्यांवर पोहचला आहे. या व्याजदरावाढीमुळे व्यापारी संस्था आणि कर्जदारांना फटका बसणार आहे. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीमुळे निर्माण होणा-या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत सक्षम असल्याचे म्हटले आहे.
