
मुंबई- भारतात ऑनलाईन खरेदी संकल्पनेने चांगलाच वेग घेतला असतानाच मोबाईल अॅपचा उपयोगही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे येत्या कांही वर्षात मोबाईल कॉमर्स ई कॉमर्सला मागे टाकेल असा अहवाल केपीएमजीने सादर केला आहे. यावर्ष अखेर मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यात सहा पट वाढ होऊन ही संख्या ९ अब्ज अॅपवर जाईल असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
ईकामर्सला मागे टाकून एम कॉमर्स सुसाट
२०१३ व २०१४ मध्ये देशात मोबाईल अॅप बाजार सर्वाधिक वेगाने वाढला आहे. जागतिक अॅप डाऊनलोडींग मध्ये भारताचे योगदान ७ टकके आहे. रॅकिंगबाबत सांगायचे तर अमेरिका, चीन आणि इंडोनेशियानंतर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. मोबाईल फोनवर इंटरनेट वापरणार्या युजरची संख्या २०१४ मध्येच ३३ टक्कयांनी वाढून १७.३ कोटींवर गेली होती. ही संख्या २०१९ पर्यंत आणखी २१ टक्कयांनी वाढून ४५.७ कोटींवर जाईल असेही या अहवालात नमूद केले गेले आहे.
