कॅनडातून पहिला युरेनियम हप्ता भारतात आला

urenium
दिल्ली -कॅनडाने सुमारे २५० टन युरेनियमचा पहिला हप्ता भारताकडे पाठविला असून त्यामुळे भारतातील अणुउर्जा रिअॅक्टरसाठी इंधन उपलब्ध झाले आहे. भारत आणि कॅनडामध्ये भारताला युरेनियम पुरवठा करण्याबाबत २०१३ मध्ये समझोता झाला होता. यावर्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्यामध्येही युरेनियम पुरवठयाबाबत सहमती झाली होती.

या नुसार पुढील पाच वर्षे कॅनडा भारताला २७३० मेट्रीक टन युरेनियम पुरविणार असून त्याची किंमत आहे ३५ कोटी कॅनेडियन डॉलर्स. भारताला रशिया आणि कझाकिस्तान यांच्याकडूनही युरेनियम पुरविले जात आहे. या यादीत कॅनडा आता तिसरा युरेनियम पुरवठादार देश बनला आहे. युरेनियमवर भारतात सध्या २१ रिअॅक्टर सुरू आहेत.

Leave a Comment