पाकिस्तानी बाजाराला ब्लॅकबेरीचा बाय बाय!

blackberry
नवी दिल्ली : पाकिस्तान सरकारशी वादानंतर अखेर पाकिस्तानातील मोबाईल बाजाराला ब्लॅकबेरी या मोबाईल कंपनीने बाय बाय केले आहे. ब्लॅकबेरी युजर्सच्या खासगी माहितीवरही पाकिस्तान सरकार नियंत्रण मिळवू पाहत असल्यामुळे पाकिस्तानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आल्याचा ब्लॅकबेरीकडून सांगण्यात आले आहे.

एका ब्लॉग पोस्टमधून ब्लॅकबेरीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मार्टी बिअर्ड यांनी सांगितले की, ब्लॅकबेरी युजर्सच्या माहितीवर पाकिस्तानला नियंत्रण हवे होते आणि त्यामुळे आमच्या युजर्सच्या खासगी माहितीची सुरक्षितता धोक्यात येत असल्यामुळे पाकिस्तान सरकारशी आम्ही सहमत नाही. पाकिस्तान सरकार ब्लॅकबेरी इंटरप्रायजेस सर्व्हिस ट्रॅफिकवर नजर ठेवण्यासाठी सक्षम होऊ पाहत आहे. यामध्ये बीईएस ई-मेल आणि बीबीएम मॅसेजचा समावेश आहे. मात्र, अशा आदेशाचे पालन ब्लॅकबेरी कदापी करणार नाही. शिवाय, आम्ही पाकिस्तान सरकारला अनेकदा सांगितले होते की, युजर्सच्या खासगी माहितीचे कधीच अॅक्सेस देऊ शकत नसल्याचेही मार्टी बिअर्ड म्हणाले.