व्हिडीओकॉनने आणले तीन नवे स्मार्टफोन

videocon
नवी दिल्ली : आपले तीन स्मार्टफोन भारतीय कंपनी असलेल्या व्हिडीओकॉनने लॉन्च केले असून या स्मार्टफोनची नवे व्हिडीओकॉन झेड ५५ डिलाईट, व्हिडीओकॉन इनफीनियम झेड ४५ डॅजल आणि व्हिडीओकॉन इनफीनियम झेड ४५ अमेझ अशी आहेत. अनुक्रमे ६ हजार ९९९ रुपये, ४ हजार ८९९ रुपये आणि ४ हजार ५९९ रुपये अशा या स्मार्टफोनच्या किंमती आहेत.

z55
कसा आहे व्हिडीओकॉन झेड ५५ डिलाईट – व्हिडीओकॉन झेड ५५ डिलाईट स्मार्टफोनचा ५ इंचाचा डिस्प्ले असून १२८०×७२० रिझॉल्युशन असून १.४GHz कॉर्टेक्स ए७ ऑक्टाकोर प्रोसेसर आणि १ जीबी रॅमची सुविधा या स्मार्टफोनला दिली आहे. ८ जीबी याची इंटरनल मेमरी असून ३२ जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे. यासोबत व्हिडीओकॉन डिलाईटचा रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सेल असून, फ्रंट फेसिंग कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा आहे. या स्मार्टफोनला २२००mAh एवढी बॅटरी क्षमता असून ३जी सपोर्टिव्ह हा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम ४.४ किट-कॅट आहे. काळा आणि पांढऱ्या रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

कसा आहे इनफीनियम झेड ४५ अमेझ – इनफीनियम झेड ४५ अमेझ या स्मार्टफोनमध्ये २ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि फ्रंट फेसिंग कॅमेरा व्हीजीए आहे. याची बॅटरी १६००mAh क्षमतेची असून कनेक्टिव्हिटीमध्ये ३जी, वाय-फाय इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत. या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम ४.४ किट-कॅट आहे.

कसा आहे इनफीनियम झेड ४५ डॅजल – व्हिडीओकॉन इनफीनियम झेड ४५ डॅजल या स्मार्टफोनला ८५४×४८० रिझॉल्युशन असलेला ४.५ इंचाचा डिस्प्ले आहे. १ जीबी रॅमसह ८ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा उपलब्ध आहे. ५ मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे.

Leave a Comment