आता १ रुपयांत मोबाईलवर दोन तास मोफत बोला

aircel
मुंबई : तुम्हाला मोबाईलवर जास्तवेळ बोलण्याची सवय आहे का? तर तुमच्यासाठी खूश खबर आहे. आता तुम्ही १ रुपयांत दोन तास चक्क मोफत बोलू शकता. ही ऑफर मर्यादीत काळासाठी आहे. ही ऑफर एअरसेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी सुरु केली आहे. तुम्ही सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत तुम्ही या योजनेनुसार मोफत कॉल करु शकता.

सकाळच्या या दोन तासांसाठी तुम्हाला केवळ १ रुपया द्यावा लागणार आहे. हे शुल्क पहिल्या कॉलसाठी असणार आहे. त्यानंतर ६ ते ८ दरम्यान केलेल्या कॉल्सवर चार्ज आकारला जाणार नाही. ही नवी स्कीम एअरसेलचे मुख्य मार्केटिंग ऑफिसर अनुपम वासुदेव यांनी लाँच केली आहे. ही योजना विद्यार्थी आणि युवा पिढीला डोळ्यासमोर सुरु करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

Leave a Comment