अभिनेत्री शिल्पा शेट्टीची स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये उडी

Shilpa
मुंबई : बुधवारी विआन मोबाईल अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांनी गुरुनानक जयंतीचा मुहूर्त साधत पाच स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत.

ग्राहकांसाठी व्ही-इमर्ज, व्ही-एम्पॉवर, व्ही-इटर्नल, व्ही-एन्कोअर आणि व्ही-१.८ ही श्रेणी विआन मोबाईलतर्फे आणण्यात आली आहे. यापैकी पहिले चार स्मार्टफोन आहेत, तर व्ही-१.८ हा फीचर फोन आहे. शिल्पा शेट्टीने लाँचिंगपूर्वी ट्विटरवरुन आपली उत्सुकता व्यक्त केली होती.

येत्या १२ महिन्यात किमान २ ते ३ टक्के मार्केट शेअरचे उद्दिष्ट असल्याचे विआन मोबाईलचे संचालक, शिल्पाचे पती राज कुंद्रा यांनी सांगितले आहे. ३ ते ४ लाख हँडसेट्स दर महिन्याला विकले जातील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. व्ही-१.८ हा केवळ ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. किटकॅट ४.४.२ व्हर्जन असलेला विआन-इमर्ज ३ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. व्ही-एम्पॉवर लॉलीपॉप ५.१ असलेला फोन ५ हजार २९९ रुपयांना असेल.

Leave a Comment