व्हॉट्सअॅपचे नवे फीचर्स

whats
मुंबई: व्हॉट्सअॅपचे नवे अपडेट सुरु झाले असून यात स्टार मेसेज आणि लिंक प्रीव्ह्यू असे फीचर लॉन्च करण्यात आले असून या नव्या व्हर्जनचे अपडेट अँड्रॉईड युझर्स डिव्हाईसवरही अपडेट झाले आहेत.

युझर्स त्यांचे महत्त्वाचे आणि खास मेसेज स्टार करुन नंतर वाचण्यासाठी या फीचरमुळे स्टोअर करु शकतात. जीमेलच्या फीचरसारखेच हे फीचर असून ज्यात एखादा खास मेलला स्टार मार्क करण्याचा ऑप्शन असतो.

उदाहरणार्थ एखाद्या ग्रुपवर तुमच्याबद्दल काही चर्चा सुरु असेल तर तुम्ही त्या मेसेजला स्टार मार्क करु शकता. नंतर तुम्ही स्टार्ड सेक्शनमधून ते वाचू शकतात. या फीचरप्रमाणेच आणखी एक फीचर अपडेट करण्यात आले आहे. ते म्हणजे लिंक प्रीव्ह्यू एखाद्या बातमीची लिंक शेअर केल्यानंतर आता त्या लिंकमधील काही मजकूर दिसणार आहे. लिंक प्रीव्ह्यूमुळे युझर्सला त्या लिंकमधील प्राथमिक माहिती दिसणार आहे.

Leave a Comment