पेप्सीचा नवा अँड्रॉइड फोन

pepsi
मुंबई : ऑक्टोबरमध्ये पेप्सिको इंक या कंपनीने घोषणा केली होती की चीनमध्ये आपला अँड्रॉइड फोन लॉन्च करणार आहे. पेप्सीने फोन पी१एस (Pepsi Phone P1s) नावाने सुमारे एका महिन्यानंतर चीनमध्ये लॉन्च केला आहे.

शीतपेयाच्या व्यवसायात काम करणाऱ्या पेप्सिकोने या नव्या क्षेत्रातही आपले नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला आहे. स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या शेन्जेन कम्युनिकेशन इक्युमेंट्स लिमिटेडशी करार केला आहे. पेप्सीसाठी ही कंपनी स्मार्टफोन तयार करणार आहे. चिनी बाजारासाठी सध्या हा फोन उपलब्ध होणार आहे. कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या रेंजमध्ये पेप्सी पी१ आणि पी१एस लॉन्च केला आहे.

Leave a Comment