भारतीय वंशाच्या महिलेकडे ‘एडीबी’च्या सर्वोच्च पदाचा ताबा !

swati-dandekar
वॉशिंग्टन : भारतीय वंशाची अमेरिकन राजनेता स्वाती दांडेकर यांची आशियाई विकास बँकेच्या ( एडीबी) कार्यकारी संचालकपदी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी नेमणूक केली आहे.

रॉबर्ट एम आर यांची जागा स्वाती दांडेकर या घेणार आहेत. एडीबीच्या कार्यकारी संचालकपदाचा दर्जा राजदूत बरोबरचा असतो. भारतीय वंशाच्या पहिल्या अमेरिकन नागरिक स्वाती या आहेत. ज्या राज्यप्रतिनिधी सभेच्या सदस्या बनल्या होत्या. बराक ओबामा यांनी इतर प्रशासकीय नियुक्त्यांसोबत अमेरिकेच्या आशियाई विकास बँकेच्या सर्वोच्च पदासाठी स्वाती यांच्या नावाची घोषणा केली आहे. स्वाती २००३ पासून २००९ पर्यंत राज्य प्रतिनिधी सदस्य राहिल्या तर २००९ पासून २०११ पर्यंत राज्या सीनेटच्या सदस्या राहिल्या. त्या १९७३ साली त्यांचे पती अरविंद दांडेकर यांच्यासोबत अमेरिकेला स्थायिक झाल्या होत्या.

Leave a Comment