करसवलती बंद केल्यास दलालांना आळा: दास

das
नवी दिल्ली: विविध प्रकारच्या कर सवलती टप्प्याटप्प्याने बंद केल्यास दलालांना आळा बसू शकेल; असे मत केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले आहे.

कर सवलती रद्द करण्यासाठीच्या कालबद्ध कार्यक्रमाच्या रूपरेषेचा प्रस्ताव केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने नुकताच तयार केला आहे. आगामी चार वर्षात कॉर्पोरेट कराचे दर ३० टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

कर सवलती रद्द करण्याबरोबरच कॉर्पोरेट कराचे दर कमी करण्यामुळे देशात उद्योगांना प्रोत्साहन मिळून औदोगिक क्षेत्रात भारत महत्वाचा स्पर्धक बनू शकेल; असा विश्वास दास यांनी व्यक्त केला. कॉर्पोरेट करांच्या दरात कपात केल्याने लहान आणि मध्यम उद्योगांना अधिक फायदा होऊ शकेल; असेही त्यांनी ट्विटरद्वारे नमूद केले आहे.

Leave a Comment