गॅलेक्सी गोल्डन थ्री फ्लिप स्मार्टफोनचे फोटो लीक

flip-phone
सॅमसंगने त्यांचा पहिला अँड्राईड फ्लिप फोन गॅलेक्सी गोल्डन टू सादर केल्यानंतर दुसरा फ्लिप फोन सादर करण्याची तयारी केली आहे. हा फोन गॅलेक्सी गोल्डन थ्री नावाने बाजारात येईल अशी माहिती टेक साईटवर दिली गेली आहे आणि फोनचे फिचर्स आणि फोटोही लीक झाले आहेत.

या स्मार्टफोनसाठी ३.९ इंची डिस्प्ले, ३ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी, अँड्राईड लॉलीपॉप ५.१ ओएस अशी फिचर्स आहेत. हा फोन फोर जी सपोर्ट करेल आणि दिसायला तो गोल्डन टू, गॅलेक्सी एस सिक्स एज शी साम्य असलेला आहे. नोट पाच प्रमाणेच याला कर्व्हड थ्री डी ग्लास दिली गेली आहे. फोनच्या किमतीबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही तसेच हा फोन बाजारात कधी लाँच होईल याचीही माहिती दिली गेलेली नाही.

Leave a Comment