चेहरा पाहून पैसे देणारे एटीएम

atm
एटीएममधून पैसे काढताना आपल्याला प्रथम कार्ड स्वाईप करावे लागते मग पासवर्ड टाकला की मशीनमधून मागितलेली रक्कम मिळते. मात्र एटीएममधून अवैध मार्गाने पैसे काढण्यासारखे गुन्हे जगभरातच सगळीकडे वाढत चालले आहेत. या गुन्ह्यांना चाप बसावा यासाठी नवनवीन उपाययोजना केल्या जात आहेत. चीनमध्ये यासाठी नवीन फॉम्युला वापरात आणला आहे.

चीनमध्ये एटीएम मधून पैसे काढताना प्रथम हे मशीन पैसे काढणार्‍याचा चेहरा स्कॅन करणार आहे. त्यांनतर युजरला फोन नंबर व पासवर्ड टाकावा लागणार आहे व नंतरच पैसे मिळणार आहेत. हा सर्व व्यवहार केवळ ४२ सेकंदात होणार आहे. सध्या अशी चेहरे ओळखणारी एटीएम नानजिंग, शेन्जेन, किंगदाऊब या तीन शहरात बसविली गेली असून लवकरच ती अन्यत्रही बसविली जाणार आहेत.

Leave a Comment