रामदेवबाबांचे आता नाईकी आणि आदिदासला आव्हान

ramdev
हरद्वार- योगगुरू रामदेवबाबा यांनी मॅगीपाठोपाठ स्पोर्टसवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपन्या आदिदास आणि नाईके यांना आव्हान देण्याची तयारी चालविली असून ते लवकरच योगवेअर बाजारात आणणार आहेत. मॅगी नूडल्सला पर्याय म्हणून आटा नूडल्स बाजारात आणून व्यवसायाचे आव्हान उभे केल्याला फार दिवस लोटलेले नाहीत.तोवरच रामदेव बाबा ग्लोबल स्पोर्टसवेअर कंपन्यांशी पंगा घेण्याच्या तयारीत आहेत. त्यापाठोपाठ हॉर्लीक्स आणि बोर्नव्हिटा या आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांचा नंबर असल्याचेही सांगितले जात आहे.

रामदेवबाबांच्या म्हणण्यानुसार मल्टीनॅशनल स्पोर्टसवेअर कंपन्या ग्राहकांना भ्रमित करतात आणि महागडी व निरूपयोगी उत्पादने बाजारात आणतात. योगवेअर म्हणून या कंपन्या महागडी उत्पादने विकतात. आमचे योगवेअर हे खादीपासून बनलेले आणि किफायती दरात उपलब्ध होईल. पतंजलीची दर्जेदार उत्पादने स्वस्त दरात उपलब्ध केली जातात व तेच आमच्या यशाचे मुख्य कारण आहे. आमची उत्पादने पारंपारिक पद्धतीने तयार केली जातात. व त्यामुळेच त्यांना मोठी मागणी येते आहे.

Leave a Comment