अंतराळ स्टेशनमध्ये फुलबागा फुलणार

salad
नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात भाज्या पिकविण्याचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर आता फुलबागा फुलविण्याची मोहिम हाती घेतली आहे. हा प्रयोग अवघड आहे मात्र अशक्य नाही असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

या मोहिमेतील वैज्ञानिक गिओइया मसा म्हणाले आम्ही अंतराळ स्थानकात भाज्या पिकवू शकलो मात्र फुले फुलविणे अवघड आहे कारण त्यासाठी प्रकाश आणि पर्यावरण परिस्थिती अधिक जटील आहे. वैज्ञानिक लिडग्रेन यांनी व्हेजी प्लांट ग्रोथ सिस्टीम सुरू केली आहे व सर्वप्रथम सूर्यफुलाच्या प्रजातीचे बीज आम्ही तयार करत आहोत. त्यासाठी लाल, हिरवे व निळे एलईडी बल्ब वापरून प्रकाश नियंत्रण केले जात आहे. त्यात रोपे कशी वाढतात याची निरीक्षणे सुरू आहेत.

अंतराळात भाज्या ३० दिवसांत पिकविता आल्या मात्र फुले फुलविण्यासाठी किमान ६० दिवस लागतील. त्यासाठी दररोज १० तास एलईडी लाईट जाळावे लागणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात टोमॅटोची रोपे लावून टोमॅटोचा आस्वाद घेणे अंतराळवीरांना शक्य होईल.२०१७ पर्यंत अंतराळात टोमॅटो पिकविण्याची नासाची योजना आहे.

Leave a Comment