पहिला किडस स्मार्टफोन भारतात दाखल

swipe
स्वाईप टेक्नॉलॉजीने स्वाईप हा किडस स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला असून भारतात आलेला हा पहिला किडस स्मार्टफोन आहे. यात जिओ ट्रेकींग, जिओ फेसिंग, एक्सपेंडेंबल पॅरंट कंट्रोल व युनिक लर्निंग एक्सपिरीयन्स अशी पॉवरफुल फिचर्स दिली गेली आहेत. या फोनची किंमत आहे ५९९९ रूपये. स्वाईप ज्युनिअर या नावाने हा स्मार्टफोन बाजारात आला आहे.

या स्मार्टफोनसाठी ४.५ इंची आयपीएस डिस्प्ले, ४ जीबी इंटरनल मेमरी, अँड्राईड किटकॅट ४.४ ओएस, सिंगल ३ जी सिम, २ एमपी चा रियर व ०.३ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी फिचर्स आहेत. फोनसाठी वायफाय, ब्ल्यू टूथ कनेकटीव्हीटी आहे तसेच प्री लोडेड पॅरेंटस फिचर दिले गेले आहे. यामुळे पालकांना आपल्या मुलांनी किती वेळासाठी इंटरनेट पाहिले,कोणत्या साईट पाहिल्या, कोणते गेम्स खेळले याची माहिती मिळेल तसेच या फोनमध्ये असलेल्या जिओ ट्रकींग मुळे पालकांना मुलांची पोझिशन ट्रॅक करणे शक्य होणार आहे.

फोनला शॉक प्रूफ ड्युरेबल डिझाईन दिले आहे त्यामुळे रफ युज केला तरी फोनचे नुकसान होणार नाही. या फोनला रियल टाईम क्लाऊड कनेक्ट दिले गेले आहे आणि क्लाऊडशी नेहमी कनेक्ट असलेला हा पहिलाच स्मार्टफोन आहे.

Leave a Comment