दिवाळी सुटीच्या निमित्ताने कोकण हाऊस फुल्ल

konkan
सिंधुदुर्ग : सध्या कोकण दिवाळी सुटीच्या निमित्ताने हाऊस फुल्ल झाले असून स्कूबा ड्रायव्हिंग स्नोर्कलिंग आणि पेरेसिलिंग हे सिंधुदुर्गात आलेल्या पर्यटकांचे खास आकर्षण ठरते आहे.

पर्यटक समुद्रा खालचे जग बघण्यासाठी गुंग झाले आहेत. कोकण म्हटले की डोळ्यासमोर येतात ते सुंदर फेसाळणारे समुद्र किनारे आणि त्याच्या दिमतीला खमंग मालवणी जेवण. हे स्वर्ग सुख प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पर्यटक सध्या कोकणात गर्दी करु लागले आहेत. सिंधुदुर्गमधील तारकर्ली देवबाग तसेच मालवणसह जिल्ह्यातले सगळे समुद्र किनारे सध्या हाऊसफुल्ल झाले आहेत. नोकरदारांना दिवाळी निमित्त पाच दिवसांच्या सुटीचे गिफ्ट दिल्यामुळे जिल्ह्यातले सगळेच हॉटेल्स फुल्ल झाले आहेत. स्कूबा ड्रायव्हिंग स्नोर्क्लिंग सोबतच तारकर्लीत आता पेरेसिलिंग सुरु झालंय. याच सर्वांचे रेट्स कमी आहेत त्यात मालवणी जेवणाचा बोनस मग काय पर्यटक आपल्या सुट्यांचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

Leave a Comment