भारताचा फेसबुक पोस्ट हटवण्यात पहिला नंबर

facebook
नवी दिल्ली : फेसबुक पोस्ट हटवण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर भारत देश आहे. एका अहवालात हे आकडे फेसबुकने जाहीर केला आहे. सोबतच २०१५ च्या पहिल्या सहा महिन्यांत वेगवेगळ्या देशांच्या सरकाराकडून यूजर डेटा मागवण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

फेसबुकने जवळपास दोन वर्षांपासून अशा प्रकारच्या मागण्यांचा खुलासा करणे सुरू केले आहे. भारत आणि टर्की या देशांमध्ये सर्वात जास्त स्थानिक कायद्यांचे उल्लंघन करणारे कमेंटस् हटवण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारताकडून पहिल्या सहामाहित तब्बल १५,१५५ पोस्ट हटवण्यात आल्याचे फेसबुकने म्हटले आहे. २०१४ सालच्या आकड्यापेक्षा हा आकडा तिप्पट मोठा आहे. तर टर्कीमध्ये गेल्या वर्षी ३,६२४ पोस्ट हटवण्यात आल्या होत्या, तर यंदा हा आकडा ४,४९६ वर पोहचला आहे.

हटवण्यात आलेल्या कॉन्टेन्टमध्ये जर्मनीच्या नाझी प्रॉप्रगंडापासून हिंसक कृत्यांच्या चित्रणाचाही समावेश आहे. साधारणत: सरकारकडून बेसिक सबस्क्रायबर माहिती, आयपी अॅड्रेस किंवा अकाऊंट कन्टेन्टची माहिती मागितली जाते. यामध्ये लोकांच्या ऑनलाईन पोस्टचाही समावेश आहे.

Leave a Comment