तुमचा सेल्फी आता पोस्टाच्या तिकिटावरही !

post
अलाहाबाद : लवकरच माय स्टॅम्प ही सुविधा टपाल विभागातर्फे सुरू करण्यात येणार असल्यामुळे तुमचा फोटो पोस्टाच्या तिकिटावर लवकरच झळकणार आहे. मुख्य टपाल कार्यालयात ही सुविधा उपलब्ध असेल. या सुविधेनुसार तुमचा सेल्फी पोस्टाच्या तिकिटावर छापता येईल. टपाल कार्यालयात तुमचा फोटो स्कॅन करून ५ रुपयांच्या पोस्टाच्या तिकिटावर छापण्यात येईल. ते पोस्टाचे तिकीट तुम्हाला अधिकृतरित्या वापरता येणार आहे. माय स्टॅम्पच्या एका कागदावर १२ पोस्टाची तिकिटे असतील. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल आणि त्या अर्जासह स्वत:चा फोटो टपाल कार्यालयात जमा करावा लागेल.

Leave a Comment