एफडीआयचे नियम शिथिल; १५ क्षेत्रांतील एफडीआय मर्यादेत वाढ

modi
नवी दिल्ली : ब्रिटन दौ-यापूर्वी एफडीआयचे नियम शिथिल करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घोषणा केली. त्यानुसार १५ प्रमुख क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक (एफडीआय) मर्यादा वाढविण्यात आली असून, या नव्या नियमावलीमुळे एफआयपीबीच्या मंजुरीची मर्यादा आता ३ हजार कोटींवरून ५ हजार कोटी होणार आहे. याबरोबरच रिजनल एअर सेवेत विदेशी गुंतवणूक मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत करण्यात आली आहे. संरक्षणाबरोबरच खाजगी बँका, प्रसारण, कृषि, खाण, विमान वाहतूक, बांधकाम, सिंगल ब्रँड रिटेल, कॅश अ‍ॅण्ड कॅरी होलसेल आदी १५ क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीसाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, आर्थिक सुधारणांसाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

लवकरच ब्रिटन आणि तुर्कस्थान दौ-यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार असून तेथील जी-२० देशांच्या बैठकीला ते उपस्थित राहणार असून, आंतरराष्ट्रीय नेत्यांशी चर्चाही करणार आहेत. या दौ-यापूर्वीच बिहार निवडणुकीत मोदी सरकारला जबरदस्त झटका बसला आहे. असे असले तरी केंद्र सरकार अस्वस्थ नाही, तर त्यांचे लक्ष्य आर्थिक विकास आहे, यासंबंधीचा संदेश जगभर पोहोचावा, या उद्देशाने आज हा निर्णय घेण्यात आला. मोदी सरकार संरक्षण, प्रसारण, खाजगी बँका, प्लँटेशन, कृषि, खाण, विमान वाहतूक, बांधकाम विकास, सिंगल ब्रँड रिटेल, कॅश अ‍ॅण्ड कॅरी होलसेल आणि मॅन्यूफॅक्चरिंगसह १५ क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढविली आहे. एवढेच नव्हे, तर सरकारने करमुक्त खरेदीवरचे नियमही शिथिल केले आहेत. याशिवाय बांधकाम क्षेत्रात पाच वर्षांच्या आता एफडीआय आणण्याची अट हटवली आहे. त्यामुळे या क्षेत्रात पाच वर्षांनंतरच एफडीआय आणता येऊ शकणार आहे.

Leave a Comment