
मुंबई : आपल्या स्मार्टफोनच्या शौकिनांसाठी अॅपलने खुशखबर आणली असून कंपनी आपल्या लेटेस्ट आयफोन ६ एस आणि आयफोन ६एस प्लसवर बायबॅक ऑफर आणि ग्राहकांसाठी ३४ हजारांपर्यंतची मोठी सूट देत आहे.
अॅपलचा दिवाळी धमाका, आयफोनच्या नव्या मॉडेल्सवर भरघोस सूट
भारतात मागील महिन्यात आयफोन ६ एस आणि आयफोन ६एस प्लस ६२ हजारांपासून ९२ हजारांच्या व्हेरियंट्समध्ये लॉन्च करण्यात आला होता. पण बाजारात मागील वर्षी आलेल्या आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस पेक्षा या फोनची किंमत ८५०० ते ९००० रुपये इतकी जास्त असल्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ६ ते १० टक्क्यांपर्यंत विक्रीत घट झाली.
अॅपलच्या चार आयफोन वितरकांपैकी एक असलेल्या इनग्राम मायक्रोने काही निवडक स्टोअर्स आणि दक्षिण भारतातील मल्टी ब्रॅण्ड सेलफोन रिटेल चेनमध्ये बायबॅक स्किम सुरु केली असून इतर तीन डिस्ट्रिब्युटरही ही स्किम लवकरच लॉन्च करणार आहे. या स्किमअंतर्गत जुने मॉडेल्स खरेदी करण्यात येणार आहे, जेणेकरुन रिटेलर्सवर बोजा पडणार नाही.
