मृत्यूपंथावरील विशाल आकाशगंगेचा भारतीय संशोधकांनी लावला शोध

giant-galaxy
पुणे – अत्यंत दुर्लभ अशा महाकाय आकाश गंगेचा शोध एनसीआरएमध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय अवकाश संशोधकांनी लावला आहे. ही आकाशगंगा सुमारे ९ अब्ज प्रकाश वर्ष दूर आहे. ‘जायेंट रेडिओ गॅलॅक्सी’ असेही अशा आकाशगंगांना म्हणतात.

संशोधकांनी शोधलेल्या या आकाशगंगेचे शास्त्रीय नाव ‘J021659-044920’ असे आहे. या आकाशगंगेचा शोध ‘जीएमआरटी’च्या माध्यमातून लावण्यात आला आहे. या आकाशगंगेचा वेध पुण्यातील खोडदमध्ये ४५ मीटर व्यासाच्या या ३० किलोमीटर परिसरात पसरलेल्या रेडिओ दुर्बिणीने घेतला आहे.

रेडीओ आकाशगंगांच्यामध्ये दशलक्ष प्रकाशवर्ष आकाराच्या आकाशगंगा मोठ्या प्रमाणात दिसतात. मात्र विशाल रेडिओ आकाशगंगा अत्यंत दुर्मिळ अशाच असतात. त्यातच अत्यंत दूरच्या आकाशगंगा तर आत्तापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्यांचाच शोध लागला आहे. त्यातीलच ही एक नवीन आकाशगंगगा आहे. मंथली नोटीस ऑफ द रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या नियतकालिकात यासंदर्भातील संपूर्ण संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Leave a Comment