केंद्र सरकारने उगारला महागाईचा बडगा

petrol
नवी दिल्ली : केंद्र सरकारने बिहारची निवडणूक संपताच महागाईचा बडगा उगारला असून पेट्रोल आणि डिझेलवरचा अधिभार आजपासून वाढवण्यात आला आहे. पेट्रोल १ रुपया ६० पैसे प्रति लिटर तर डिझेलवर ४० पैशांनी अधिभार वाढवण्यात आल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या अधिभारात पाचव्यांदा वाढ केली आहे. १२ नोव्हेंबर २०१४ ते १६ जानेवारी २०१५ या कालावधीत पेट्रोल-डिझेलच्या अधिभारात चार वेळा वाढ केली होती.

Leave a Comment