बंगळुरू पोलिसांसाठी कॉपकार्ट लाँच

banglore
बंगळुरू – अॅमेझॉन, स्नॅपडील, फ्लिपकार्ट यांसारख्या कंपन्यांनी ऑनलाईन मार्केटींग बाजारात धुमाकूळ घातला असून हजारो कोटींची उलाढाल सध्या एका दिवसात ऑनलाईन बाजारात होत आहे. अनेक कंपन्या या उद्योगात भारतासारख्या देशातही ऑनलाईन खरेदी-विक्रीचा वाढता जोर पाहून उतरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बंगळुरूचे पोलीस उपमहासंचालक अभिषेक गोयल यांनी एक नामी शक्कल लढवली असून फ्लिपकार्टच्या स्पर्धेत बंगळुरू पोलिसांना ऑनलाईन खरेदीसाठी ‘कॉपकार्ट’ हे अॅप्लीकेशन तयार केले आहे. हे अॅप्लीकेशन नुकतेच बंगळुरू पोलिसांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले.

इंटरनेच्या युगात स्मार्टफोनची वाढती खरेदी आणि अँड्रॉईड फोन्सचा वाढता वापर लक्षात घेता विविध कंपन्यांनी आपले स्वतंत्र अॅप सुरू केले आहे. त्यामध्ये ऑनलाईन शॉपींगच्या कंपन्यांचे प्रमाण वाढत आहे. आपल्या अँड्रॉईड फोन्समध्ये अॅप डॉउनलोड करुन आपल्या मनपसंतीची खरेदी आपण घरबसल्या करू शकतो. या खरेदीच्या स्पर्धेत पोलिसांसाठी विशेष अॅप बंगळुरू आर्म फोर्सने तयार केले. कॉपकार्ट असे या अॅप्लीकेशनचे नाव असून याद्वारे हवालदार ते पोलीस महासंचालकांपर्यंत सर्वांनाचा ऑनलाईन शॉपींग करता येणार आहे. टेकचेफ या कंपनीने या सॉफ्टवेअरची निर्मीत्ती केली असून अभिषेक गोयल यांची ही कल्पना आहे. कॉप म्हणजे पोलीस म्हणूनच हे अॅप केवळ पोलिसांनाच वापरता येणार आहे. सर्वप्रथम हे अॅप पहिल्या २० हजार पोलिसांनाच वापरता येईल, असे गोयल यांनी सांगितले. तसेच ही संकल्पना यशस्वी झाल्यानंतर देशातील इतर राज्यातही कॉपकार्ट सुरू करण्यात येणार असल्याचे गोयल म्हणाले. आपल्या मोबाईलमध्ये हे अॅप डॉऊनलोड केल्यानंतर पोलिसांना एक युजर आयडी व पासवर्ड देण्यात येईल, त्यानंतरच ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. या अॅप्लीकेशनद्वारे खरेदी केल्यानंतर बंगळुरू पोलिसांना खरेदीवर विविध प्रकारच्या सवलती आणि सूट मिळणार आहे.

Leave a Comment