
नवी दिल्ली- आणखी दोन नवीन फिचर्स तरुणाईमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअॅपने युझर्ससाठी आणले असून जर तुम्हाला महत्त्वाचे मॅसेजेस आले आहेत आणि ते नंतर वाचायचे असतील तर त्यासाठी व्हॉट्सअॅपने ‘स्टार’चा नवीन पर्याय दिला आहे.
‘स्टार’चा व्हॉट्सअॅपवर नवीन पर्याय
आपल्या युझर्ससाठी नेहमी नवनवीन फिचर्स व्हॉट्सअॅप देत असते. आता ‘स्टार’ आणि ‘गुगल बॅकअप’ हे दोन नवीन फिचर्स व्हॉट्सअॅपने दिल्यामुळे युझर्सला महत्त्वाचे मॅसेजेस जतन करून ठेवता येणार आहेत. ‘स्टार’मुळे युझर्सला मॅसेजेस शोधणे सोपे जाणार आहे. या फिचर्ससाठी युझर्सला नवे व्हर्जन डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. जर ते झाले नाही तर व्हॉट्सअॅपच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येणार आहे.
