भारतात लॉन्च झाला मायक्रोमॅक्सचा कॅनव्हास ५

micromax
मुंबई : भारतात मायक्रोमॅक्सने आपला नवा कॅनव्हास ५ स्मार्टफोन लॉन्च केला. या फोनला बजेट स्मार्टफोन म्हटले, तरी तो एवढाही स्वस्त नाही, हा स्मार्टफोन दिवाळीच्या तोंडावर लाँच करण्यात आला.

मोबाइल प्रेमींसाठी कंपनीने आणखी एक ऑप्शन दिला आहे. २०१३ साली लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन कॅनव्हास 4चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. याची किंमत रु. ११ हजार ९९० रूपये आहे.

मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस ५ चे खास फीचर – १) ३ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेज २) ५.२ इंच डिस्प्ले ३) १०८०×१९२० रेझ्युलेशन पिक्सल, गोरिला ग्लास ४) १.३ GHz मीडियाटेक एमटी ६७५३ प्रोसेसर ५) १३ मेगापिक्सल ऑटोफोकस रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा ६) ४ जी कनेक्टिव्हीटी ७) २९०० mAh बॅटरी क्षमता

Leave a Comment