लष्कर नसलेले देश

[nextpage title=”लष्कर नसलेले देश”]
collarge
जगाच्या अर्थकारणात आज प्रत्येक देशाचे रक्षा म्हणजे संरक्षण बजेट हा चर्चेचा विषय असतो. कोणत्या देशाने किती बजेट संरक्षणासाठी ठेवले आहे यावरही कांही आडाखे बांधले जात असतात. अमेरिकेचे रक्षा बजेट सर्वाधिक म्हणजे ६१० अब्ज डॉलर्सचे आहे. त्या खालोखाल चीनचे बजेट आहे तर भारताचे संरक्षणासाठीचे बजेट आहे ४१ अब्ज डॉलर्स. मात्र जगाच्या पाठीवर असेही कांही देश आहेत, जेथे लष्कर हा प्रकार नाही. गरज भासली तर हे देश भाड्याने दुसर्‍या देशांचे सैनिक बोलावतात. अशा देशांची संख्या २२ च्या वर आहे. त्यातील कांही देशांची ही माहिती

costarica
१) कोस्टा रिका
मध्य अमेरिकेतील या देशात १९४८ साली राष्ट्रपती निवडणूकीत गडबड होऊन बडखोरांनी हा देश ताब्यात घेतला व १९५३ साली सत्ता स्थापन केली. त्यानंतर येथे १४ वेळा राष्ट्रपती निवडणुका झाल्या मात्र त्या अतिशय शांततेत पार पडल्या. या देशात लष्कर नाही.[nextpage title=”२)लिंचेनस्टाईन”]

liechenstein

मध्य युरोपातील हा छोटासा देश. त्यानी १९६८ साली स्वतःची सेना भंग केली कारण लष्कराचा खर्च भागविण्याइतकी त्यांची आर्थिक परिस्थिती सबळ नव्हती. तेव्हापासून युद्ध होईल अशी शंका आली तर पुन्हा लष्कराची स्थापना करायची असा निर्णय त्यांनी घेतला मात्र अजून तरी तशी वेळ त्यांच्यावर आलेली नाही. हा देश काळ्या पैशांबाबतच्या चर्चेने नेहमीच प्रसिद्धीत असतो.[nextpage title=”३) सामोआ”]

3-Samoa
१९६२ साली न्यूझीलंडच्या गुलामीतून मुक्त झालेल्या या देशाला स्वतःचे सैन्य नाही. मात्र स्वातंत्र्य देतेवेळी न्यूझीलंडने त्यांना गरज असेल तेव्हा सैन्य पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. पश्चिम सामोआ द्विपसमुह पोलेनेशियाचा भाग मानला जातो.[nextpage title=”४)अंडोरा”]

andora

युरोपतील या देशाची स्थापना १२७८ साली झाली आहे. ४६८ चौरस किलोमीटरचा परिसर असलेला हा देश स्की रिसॉर्ट आणि ड्यूटीफ्री दुकानांसाठी प्रसिद्ध आहे. हे करचुकवेगिरी करणार्‍यांचे नंदनवन म्हटले जाते. स्पेन व फ्रान्सने या देशाला गरज असेल तेव्हा सैनिक पुरविण्याचे आश्वासन दिलेले आहे.[nextpage title=”५)तुवालू”]

tuvalu

भारत प्रशांत द्विप सहयोग संघटनेतील हा देश २०१४ साली स्थापन झाला आहे.२०१५ मध्ये जयपूर परिषदेत १४ देशांचे संमेलन झाले त्यात या देशाचा समावेश होता. अवघा २६ चौरस किलोमीटरचा हा चिमुकला देश. त्याची लोकसंख्या आहे १० हजार. या देशाला स्वतःचे लष्कर नाही. हा देश कॉमनवेल्थचा सदस्य आहे आणि ब्रिटन प्रमाणे त्यांचे संसदीय राजतंत्र आहे.[nextpage title=”६)व्हेटिकन सिटी”]

vatican

इटलीची राजधानी रोमच्या पोटातच असलेल्या हा स्वतंत्र देश. जगातील सर्वात छोटा देश असून त्याचे क्षेत्रफळ अवघे ०.४४ चौरस किलोमीटर आहे. याची लोकसंख्या आहे केवळ ८४०. कॅथॉलिक चर्चचे मुख्यालय असलेल्या व्हेटीकन सिटीमध्ये पोप आणि चर्चचे अन्य अधिकारी राहतात. येथे स्वतंत्र सेना नाही.[nextpage title=”७)ग्रेनेडा”]

greneda

मोठे बेट अन्य छोटी बेटे असा ३४४ किमीचा परिसर असलेला व १ लाख ५ हजार लोकसंख्येचा हा देश कॅरेबियन व अटलांटिक समुद्राच्या मध्यात आहे. मसाल्यांसाठी जगभर प्रसिद्धी असलेल्या या देशात १९८३ साली सैनिकांची बंडाळी झाली ती अमेरिकेच्या हस्तक्षेपाने विरली. मात्र तेव्हापासून या देशात नेहमीचे सैन्य नाही.[nextpage title=”८) नाऊस”]

mouse-island

पॅसिफिक महासागरातील एक बेट म्हणजे हा देश. त्याचे क्षेत्रफळ आहे २१.१० किमी व लोकसंख्या आहे १० हजार. हा देश मायक्रोनेशिया बेटाचा भाग असून करारानुसार या बेटाच्या सुरक्षेची जबाबदारी ऑस्ट्रेलियाकडे आहे.[nextpage title=”९) मॉरिशस”]

mauritius

भारताला जवळचा असलेला हा देश १९६८ पासून नो स्टँडींग आर्मी असलेला देश आहे. सर्व लष्करी, पोलिसी आणि सुरक्षा संबंधी जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी १० हजार ड्यूटी पर्सनल येथे नेमले गेले आहेत. त्यातील ८ हजार नॅशनल पोलिस फोर्स मधले असून ते अंतर्गत सुरक्षा व कायदा सुव्यवस्था सांभाळतात. १५०० चा स्पेशल मोबाईल फोर्स व नॅशनल कोस्ट गार्डचे ५०० सदस्य अशी ही सुरक्षा व्यवस्था असून या दलांना अगदी छोटी शस्त्रेच दिली जातात. [nextpage title=”१०) किरीबाटी”]

kiribati

या देशाच्या घटनेने फकत पोलिस दलासाठी परवानगी दिली आहे. हे पोलिस दल मेरीटाईम सर्वेलन्स वर लक्ष ठेवून असते. त्यांच्याकडे छोटी शस्त्रे व १ पेट्रोलिंग बोट इतकीच सामग्री आहे. देशाला सैन्य नाही मात्र गरजेनुसार ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड देशांकडून भाड्याने सैनिक पुरविण्याचा करार केला गेला आहे.

Leave a Comment