लवकरच फेसबुकचे न्यूज अॅप भेटीला

facebook
मुंबई : पुढील आठवड्यात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक नवे अॅप घेऊन येत आहे. फेसबुक न्यूज अॅप पुढील आठवड्यात लाँच करण्याची शक्यता असून या अॅपला अनेक मीडिया ग्रुप्सने रिअल टाईम बातम्या देण्याचा करार केल्याचे सांगण्यात येत आहे.

या अॅपचे वॉशिंग्टन पोस्ट, वोग यासारखे मोठे मीडिया ग्रुप भागीदार असल्याची माहिती मिळत आहे. युझर्सना कोणत्याही न्यूज पब्लिशर्सच्या न्यूज फीड आणि त्याच्याशी संबंधित नोटिफिकेशन सबस्क्राईब करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. ‘इन्स्टंट आर्टिकल सर्व्हिस’ फेसबुकने सुरु केली आहे. याद्वारे न्यूज पब्लिशर्स आपल्या बातम्या थेट यामध्ये पब्लिश करू शकतील. यासाठीही जगभरातील मोठ्या पब्लिशर्सनी फेसबुकशी करार केला आहे.

ब्रेकिंग न्यूजसाठीही फेसबुक अॅप बनवत आहे अशी माहिती गेल्याच महिन्यात सांगण्यात आल्यामुळे आता येऊ घातलेल्या नव्या अॅपमध्ये ब्रेकिंग न्यूजचा ऑप्शन असू शकतो.

Leave a Comment