लंडनमध्ये खाजगी क्षण टिपणा-या ड्रोन्सचा उच्छाद

drone
लंडन : दुस-याच्या खासगी अतिशय खासगी क्षणांना कॅमे-यात कैद करुन इंटरनेटवर विकणे किंवा अपलोड करणे नवे नाही. परंतु, पीपिंग टॉम किंवा ड्रोनचा वापर करुन बसविण्यात आलेल्या कॅमे-यांनी सर्व प्रायव्हसी पॉलिसींचे उल्लंघन करीत लंडनमध्ये उच्छाद मांडला आहे. हे ड्रोन्स उंच उंच इमारतींच्या खिडक्यांतून आपल्या कॅमे-याद्वारे पती-पत्नी किंवा प्रेमी युगुलांच्या खास क्षणांना कॅमे-यात कैद करतात. लंडनच्या पोलिसांच्या जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी असे अनेक कॅमेरे पकडले. त्या कॅमे-यांमध्ये युगुलांचे सेक्स करतानाचे व्हिडिओ सापडले. इतकेच नव्हे तर सायबर सेलच्या असे लक्षात आले की हे व्हिडिओ इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध आहेत.

Leave a Comment