पंतप्रधानांच्या हस्ते ३ सुवर्ण योजनांचे उद्घाटन

modi1
नवी दिल्ली: सरकारने यंदा धनत्रयोदशी किंवा पाडव्याला सोने खरेदीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सरकारी सोन्याचे कर्जरोखे बाजारात जारी केले आहेत. या कर्जरोख्यांच्या माध्यमातून एक ग्रॅमच्या पटीत सोने पेपर स्वरुपात खरेदी करता येणार आहेत.
धनत्रयोदशीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोन्याच्या तीन योजनांचे उद्घाटन केले आहे. यावेळी अशोक चक्र असलेले भारतीय नाण्यांशिवाय गोल्ड मॉनेटायझेशन आणि गोल्ड बाँड योजनांचे उद्घाटन केले. या स्कीम अंतर्गत ५ आणि १० ग्रामचे सोन्याचे शिक्के आणि २० ग्रामचे सोन्याचे बिस्किट विक्रीसाठी उपलब्ध असतील.

भौतिक रुपात सोन्याची मागणी कमी करण्यासाठी आणि देशात निरुपयोगी पडलेले २० हजार टन सोन्याचा वापर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तीन योजना सुरू केल्या आहेत. पंतप्रधानांनी पहिल्यांदा असे नाणे आणि बुलियन बाजारात आणले ज्याच्यावर भारताचे राष्ट्रचिन्ह अशोक चक्र आणि महात्मा गांधींचा फोटो आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले, देशात २० हजार टन सोने बेकार पडलेले आहे, महिला सशक्तीकरणाचा महत्त्वपूर्ण भाग सोने आहे.

५ ग्रामचे १५ हजार, १० ग्रामचे २० हजार एमएसटीसी स्टोरद्वारे विकले जातील. गोल्ड मॉनिटायझेन स्कीम अंतर्गत भारतीय नागरिकांना गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. या योजनेअंतर्गत ३० ग्रामहून अधिक सोने जमा केले जावू शकते. जमा केलेल्या सोन्यावर अडीच टक्क्यांनी व्याज मिळेल. या स्कीममुळे घरात आणि बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यावर व्याजाच्या रुपात चांगली कमाई होऊ शकेल.

९९५ शुद्धता असलेले कमीतकमी ३० ग्राम सोन्याएवढे सोन्याचा तुकडा, नाणे किंवा दागिणे या योजनेत जमा केले जावू शकते. स्वर्ण बाँड योजनेअंतर्गत गुंतवणुकदारांना दोन ग्राम सोन्यापासून अधिकाधिक ५०० ग्राम सोन्यापर्यंत बाँड विकत घेण्याचा पर्याय असेल. बाँडचा काळ आठ वर्ष असेल आणि पाचव्या वर्षी बाहेर निघण्याचा पर्याय आपल्याला मिळेल.

Leave a Comment