विंडोज ७ व ८.१ बंद होणार

windows
मायक्रोसॉफटने त्यांच्या विंडोज सेव्हन व विंडोज ८.१ आक्टोबर २०१६ नंतर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विंडोज सेव्हन प्रोफेशनल व विंडोज ८.१ प्री इन्स्टॉल पीसी व लॅपटॉप बंद करण्यात येत असल्याचे मायक्रोसॉफ्टच्या विडोज लाईफस्टाईल फॅक्ट शीट मध्ये नमूद केले गेले आहे. तसेच विंडोज ८ असलेली डिव्हायसेस ३० जून २०१६ मध्ये बंद केली जाणार आहेत.

मायक्रोसॉफ्टने विंडोज १० ओएस १ अब्ज डिव्हायसेस मध्ये देण्याचे ध्येय ठरविले आहे. त्यामुळे विंडोज ७ व ८.१ बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कंपनीची ही पॉलिसी नेहमीच राहिली आहे. दर दोन वर्षांनी कंपनी पहिली ओएस बंद करते. मात्र विंडोज ८ फ्लॉप गेल्यामुळे आणि विंडोज ७ची लोकप्रियता वाढल्याने या दोन्ही ओएस दोन वर्षांपेक्षा अधिक काळ राहिल्या आहेत.

Leave a Comment