स्वाइपने आणला स्वस्त ४जी स्मार्टफोन!

swipe
मुंबई: स्वाइप टेक्नॉलॉजीने एलीएट २ बजेट ४जी स्मार्टफोन लॉन्च केला असून याची किंमत अवधी ४,६६६ रुपये आहे. अँड्रॉइड ५.१ लॉलीपॉपवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेल रियर आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला आहे. या ड्यूअल सिम स्मार्टफोनमध्ये ४.५ इंच qHD IPS डिस्प्ले दिला असून १ जीबी रॅमसोबत १.३GHz स्पीडचा क्वाडकोर प्रोसेसर दिला आहे. सोबतच याची इंटरनल मेमरी ८ जीबी आहे. जे एसडीकार्डद्वारे ३२जीबीपर्यंत वाढवू शकतो. या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी वायफाय, ब्लूटूथ, यूएबी, जीपीएस आणि ए जीपीएससारख्या सुविधा दिल्या आहेत.