बेकायदेशीर सावकारीला आळा बसणार: जेटली

arun-jaitley
नवी दिल्ली: जागतिक स्तरावर यांत्रिक माहिती आदानप्रदान यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार असल्याने आगामी एक ते दोन वर्षांतच बेकायदेशीर सावकारी अशक्य होणार असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज व्यक्त केले.

बेकायदेशीर सावकारीच्या माध्यमातून काळा पैसा जमा करणार्‍यांवर लगाम घालण्यासाठी जागतिक यंत्रणा लवकरच सक्रिय होणार आहे. आगामी दोन वर्षांतच या यंत्रणेचे परिणाम दिसून येणार आहेत. ही यंत्रणा अस्तित्वात आल्यानंतर बेकायदेशीर सावकारी करणार्‍यांना फार वाईट दिवस येणार आहेत, असा इशारा जेटली यांनी दिला. ‘नेटवर्किंग द नेटवर्क’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते.

यावेळी जेटली म्हणाले की, कर बुडवेगिरी करून मोठ्या प्रमाणात काळा पैसा विदेशात जमा करण्याच्या प्रवृत्तीवर आता बराच आळा बसला आहे. जी-२० राष्ट्रसमुहाने या दिशेने जो पुढाकार घेतल्याने हे शक्य झाले आहे.

काळ्या पैशावर आवर घालण्यासाठी संपूर्ण जगच एकत्र आल्याने, यापुढे तुम्ही एका देशाच्या हद्दीत पैसा कमविल्यानंतर केवळ नफा कमविण्यासाठी तो दुसर्‍या देशातील बँकेत जमा करू शकणार नाही. त्या देशाला कर द्यावाच लागणार आहे, असे जेटली यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment