शिंदेंचा राजीनामा ही राजकीय स्टंटबाजी – अशोक चव्हाण

ashok-chavan
मुंबई- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भर जाहीरसभेत ठाण्याच्या पालकमंत्री पदाचा सोपविलेला राजीनामा ही केवळ स्टंटबाजी असल्याची टीका राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.

राजीनामा कोणीही देणार नाही. मात्र शिवसेना-भाजपमधील राजकीय संबध विकोपाला जातील अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे शिवसेना-भाजपचे सत्तेचे राजकारण असल्याचे मत व्यक्त केले. यांची मैत्री नेमकी कशी आहे हे आता जनतेला कळेल. हे सत्तेसाठी भाषण असून मुख्यमंत्र्यानी यावर एक्शन घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment