आता यंत्रमानव बनणार रणभूमीवरील सैनिक

robo
वॉशिंग्टन: माणसांप्रमाणे सफाईदार हालचाली करणाऱ्या यंत्रमानवाची निर्मिती करण्यास जर्मन आणि अमेरिकन संशोधकांना यश आले आहे. त्यामुळे यापुढील काळात रणभूमीवर युद्ध करताना अथवा आग, अपघातासारख्या आपत्तीच्या वेळी बचावकार्यासाठी सैनिक आणि अग्निशामक जवानांच्या ऐवजी यंत्रमानवांच्या फौजा उतरलेल्या दिसल्या; तर आश्चर्य वाटायला नको.

चालताना मानवी; तसेच विविध प्राण्यांच्या शरीरातील स्नायूंच्या हालचालींचे सखोल निरिक्षण करून ‘स्प्रिंग मास’ ही यंत्रणा विकसित करण्यात
संशोधकांना यश आले आहे. या यंत्रणेद्वारे निर्जीव यंत्रांना संगणकाद्वारे नियंत्रित हालचाली करण्यास युक्त बनविणे शक्य झाले आहे; अशी माहिती ऑरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटी येथील संशोधक जोनाथन हर्स्ट यांनी दिली. या यंत्रणेमुळे यंत्रमानव मानवी शरीराप्रमाणे चालू शकतील. पळू शकतील. खडबडीत दुर्गम मार्गावरूनही योग्य संतुलन राखून हालचाली करू शकतील; असा दावा त्यांनी केला.

या संशोधनुसार नव्या प्रकारचे यंत्रमानव तैयार करण्यास सुरूवात झाली असून त्यामुळे यंत्रमानवांच्या उपयुक्ततेत मोठी भर पडणार आहे. घरातील अथवा कारखान्यांमधील अनेक प्रकारची कामे हे यंत्रमानव अधिक सुलभतेने व कार्यक्षमतेने करू शकणार आहेत; असा संशोधकांचा दावा आहे.

Leave a Comment