केवळ १ रुपयात खरेदी शाओमीचे प्रोडक्ट

mi
मुंबई: सणासुदींच्या दिवसांमध्ये ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरील स्पर्धेत चीनी मोबाइल कंपनी शाओमीनेही उडी घेतली असून आपल्या ग्राहकांसाठी शाओमी एक धमाकेदार ऑफर्स आणणार आहे.

शाओमीचे प्रोडक्ट केवळ १ रुपयात या ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे. ज्यामध्ये एमआय बँण्ड, पॉवर बँकचा समावेश आहे. स्मार्टफोन या ऑफरमध्ये खरेदी करता येणार नाही. मात्र काही गॅजेट नक्की मिळतील.

या सेलची माहिती देताना शाओमी इंडिया हेड मनू जैन यांनी सांगितले की, शाओमीच्या फ्लॅश सेलमध्ये १ रुपयात अनेक शानदार डिव्हाइस खरेदी करता येतील. याआधी शाओमी इंडियाने ट्विटरच्या माध्यमातून या सेलबाबत संकेत दिले आहेत.

शाओमी आपल्या ग्राहकांना दिवाळी सणानिमित्त आपल्या अनेक प्रोडक्टवर मोठ्या प्रमाणात सूट देऊ शकते. कंपनीच्या mi.com वेबसाईटवर प्रोडक्ट उपलब्ध असतील. फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या साईटवरही शाओमीचे प्रोडक्ट विक्रीसाठी उपलब्ध असून ज्यामध्ये शाओमी एमआय४आय ९,९९९ रुपयाला उपलब्ध आहे. तर शाओमीच्या एमआय pad वर ३००० रुपयाची सूट देण्यात आली आहे.

Leave a Comment