
नवी दिल्ली – दिल्लीतील आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याचा संवाद झाला. हा संवाद टाऊनहॉलमध्ये झाला असून झुकेरबर्गने यादरम्यान कँडी क्रशची समस्या लवकरच दूर करणार अशी ग्वाही दिली आहे. भारतात फेसबुक वापरणारे नागरिक फेसबुकवर येणाऱ्या कँडी क्रशच्या रिक्वेस्टमुळे त्रस्त आहेत.
भारतात आहेत जगातील सर्वात जास्त फेसबुकचे युजर – झुकेरबर्ग
त्याचबरोबर झुकेरबर्गने अमेरिकेनंतर जगातील सर्वात जास्त फेसबुक युजर हे भारतात असून इंटरनेट अजून भारतातील कोट्यवधी लोकांजवळ पोहोचले नसल्यामुळे येथे अजूनही खूप क्षेत्रात अनेक संधी असल्याचे सांगितले.
यावेळी इंटरनेट.ओआरजीच्या काही जमेच्या बाजुही फेसबुक प्रमुखाने सांगितल्या. तर नेट न्यूट्रॅलिटीवर बोलताना पुन्हा एकदा याला झुकेरबर्गने पाठिंबा दर्शविला आहे. पण यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगळे नियम असल्याचेही त्याने सांगितले.
