टेलिकॉम कंपन्यांचा कॉल ड्रॉपचे पैसे देण्यास नकार

call-drop
नवी दिल्ली – ट्रायने काही दिवसांपूर्वीच मोबाईलवर जर कॉल ड्रॉप झाल्यास तर त्याची नुकसान भरपाई म्हणून टेलिकॉम कंपन्यांनी एक रूपया द्यावा असा निर्णय दिला होता. पण प्रत्यक्षात टेलिकॉम कंपन्यानी ही नुकसान भरपाई देण्यास सपशेल नकार दिला आहे.

कॉल ड्रॉपची नुकसान भरपाई द्यायची झाली तर टेलिकॉम कंपन्यांना ५४ हजार कोटींचा भुर्दंड पडेल असे टेलिकॉम कंपन्यांचे म्हणणे आहे. यात छोट्‌या टेलिकॉम कंपन्यांचे प्रचंड नुकसान होईल, असेही या कंपन्यांचे म्हणणे आहे. टेलिकॉम कंपन्या याबद्दल ट्रायशी वाटाघाटी करत आहे. या कंपन्यांचे प्रतिनिधी ट्रायच्या प्रमुखांची पुन्हा भेट घेणार आहेत.

Leave a Comment