
नवी दिल्ली: आपल्या नेटवर्कच्या तीन लाखांहून अधिक सीट्ससाठी कमी पैशात प्रवासाची घोषणा कमी भाडे आकारणारी विमान कंपनी स्पाइसजेटने केल्यामुळे आता घरगुती प्रवासाचे मूळ तिकीट अवघ्या ७४९ रुपयांमध्ये मिळणार आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मूळ भाडे ३,९९९ रुपये असेल.
स्पाइसजेटची प्रवाशांना दिवाळी भेट, अवघ्या ७४९ रुपयांत विमान प्रवास
आपल्या जाहिरातीत स्पाइसजेटने हा ‘दिवाळी सेल धमाका’ असल्याचे म्हटले आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपासून पुढील ९ महिने या योजनेअंतर्गत प्रवास करता येईल. त्यासाठी आजपासून २९ ऑक्टोबरपर्यंत आपण तिकीट बुकिंग करू शकता. या तिकीटवर १ फेब्रुवारी २०१६ ते २९ ऑक्टोबर २०१६पर्यंत प्रवास करता येईल.
स्पाइसजेटने सांगितले की, प्रत्येक प्रकारच्या शुल्कासह एका बाजूचे भाडे सर्व मोठ्या शहरांसाठी आणि आकर्षक घरगुती पर्यटक स्थळांसाठी लागू असेल. या योजनेअंतर्गत दिल्ली-अमृतसर आणि अहमदाबाद-मुंबईचे मूळ भाडे ७४९ रुपये इतके असेल.
