मॅगीची लवकरच भारतीय बाजारात वापसी

maggi
नवी दिल्ली: मॅगीच्या उत्पादनाला भारतात सुरुवात करण्यात आली असून भारतातील तीन प्रकल्प मॅगीच्या उत्पादनासाठी पुन्हा सुरु करण्यात आले आहेत.

कंपनीने सध्या तरी कर्नाटक, पंजाब आणि गोवामधील मॅगीचे उत्पादन सुरु केले आहे. त्यानंतर इतर राज्यातील मॅगीचे उत्पादन सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन मिनिटांत तयार होणारी मॅगी भारतात पुन्हा आली आहे. नेस्ले मुंबई उचक न्यायालयाच्या आदेशानुसार मॅगीचे ताजे नमूने तीन मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये परिक्षणासाठी पाठवले जातील. त्यानंतर मॅगी विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Leave a Comment