आता ४ तास आधी लागणार रेल्वे आरक्षणाचा तक्ता

railway
मुंबई: आता ४ तास आधी तास-दोन तास आधी लागणारे रेल्वे आरक्षणाचा तक्ता लागणार असल्यामुळे प्रवाशांचा ऐनवेळी उडणारा गोंधळ टळणार आहे.
हा आदेश रेल्वेच्या सर्व विभागांना देऊन ३० ऑक्टोबरपर्यंत माहिती देण्याचे कळवण्यात आले आहे. पण चार तास आधी आरक्षणाचा तक्ता लागल्यावर
वेटिंग तिकिट कन्फर्म होणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोयही होणार आहे. तक्ता तयार झाल्यानंतर जे तिकिट रद्द करण्यात येतील, ते ट्रेन मार्गस्थ होण्याआधी बूक केले जातील. चार तास आधी तयार झालेला तक्ता हा इंटरनेटवरही उपलब्ध केला जावा, ज्यामुळे रिकाम्या सीट्स लगेच भरल्या जातील, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Comment