डिसेंबर महिन्यात बँकांचा संप

strike
बडोदा – सरकारच्या भारतीय स्टेट बँकेला इतर बँकांपासून वेगळे करण्याच्या प्रयत्नांना विरोध म्हणून, तसेच अन्य मागण्यांबाबत केंद्रावर दबाव आणण्यासाठी बँक कर्मचारी संघटनांनी येत्या २ डिसेंबर रोजी देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे.

याबाबतची माहिती अ. भा. बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सी. एच. व्यंकटचलम् यांनी दिली. १ आणि २ डिसेंबर रोजी स्टेट बँकेनेही आपल्या सर्व शाखांमध्ये काम बंदचे आवाहन केले आहे.

आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि त्याचा परिणाम आर्थिक व्यवहारावर मोठ्या प्रमाणात दिसून येईल. २ डिसेंबरच्या बंदपूर्वी आम्ही आजपासून आंदोलनाची मालिका सुरू करणार आहोत. हे आंदोलन महिनाभर सुरू राहाणार आहे. या काळात सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला, तर संप मागे घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment