अॅपलवर एचटीसीचा डिझाईन चोरल्याचा आरोप

apple
मुंबई : एचटीसीच्या ‘वन ए९’च्या लॉन्चिंगनंतर आता नव्या वादाला सुरुवात झाली असून स्मार्टफोनच्या डिझाईनवरुन हा वाद उद्भवला आहे. आपल्या हँडसेट डिझाईन अॅपलने चोरल्याचा आरोप एचटीसी कंपनीने केला आहे.

एका चीनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एचटीसीच्या उत्तर आशियाचे सीईओ जॅक टोंग यांनी हा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, २०१३साली यूनी बॉडी मेटल क्लॅड फोन आम्ही बनवला होता. एचटीसीची डिझाईन अॅपलने बॅक अँटिनाने कॉपी केली आहे.

२०१३ मध्ये लॉन्च केलेल्या वन एम७चा दाखला देत टोंग यांनी अॅपलने चोरलेले डिझाईन याआधीही एचटीसीने सादर केली होती, असे स्पष्ट केले आहे. याआधीच्या मॉडेलच्या तुलनेत नवा स्मार्टफोन स्लीम बनवला असल्याने अॅपलच्या आयफोनची डिझाईन कॉपी करण्याचा प्रश्नच नसल्याचं टोंग म्हणाले. अॅपलकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Leave a Comment