स्नॅपडीलकडून फॅशन मंडे आणि अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन दिवाळी सेल जाहीर

combo1
हैदराबाद – दिवाळीच्या मुहूर्तावर ई-कॉमर्स कंपन्यांनी यंदा ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव केला असून फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अॅमेझॉन या अव्वल ऑनलाईन कंपन्यांच्या १५ ते १८ ऑक्टोबरला झालेल्या बिग बिलियन सेलला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. स्नॅपडील आणि अॅमेझॉनने पुन्हा आपला सेल ऑनलाईन सेल जाहीर केला असून आजपासून तीन दिवस म्हणजे २६, २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन मोबाईल अॅपवर सर्व वस्तूंवर भरघोस सूट देण्यात आली आहे. तर स्नॅपडीलने आज खरेदीचा सुपर मंडे घोषित करुन कोणत्याही वस्तुवर बाय वन गेट वन फ्रि ही सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे ग्राहकांची दिवाळी खरेदी आजच होणार आहे.

ऑनलाईन खरेदीसाठी यंदाच्या दिवाळीत नेटिझन्सही पुढे सरसावले आहेत. दिवाळीला अजून थोडा वेळ आहे. मात्र दिवाळीची खरेदी सराव ग्राहकांकडून नवरात्रौत्सवापासूनच सुरू झाला आहे. ऑनलाईन विक्री वेबसाईटवर तर असेच चित्र सध्या दिसत आहे. आजपासून सुरू होणारा सेल अॅमेझॉनने केवळ मोबाईल अॅपवर जाहीर केला आहे तर ग्राहक स्नॅपडीलच्या संकेतस्तळावरही अनेक वस्तूंवर सूट मिळवू शकतात.

ग्राहकांना ५० ते ८० टक्के सवलत फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अॅमेझॉन या कंपन्यांनी देत याला अक्षरश विक्री युध्दाचेच स्वरूप दिले आहे. एकुण वर्षभरात होणाऱ्या ऑनलाईन विक्रीपैकी सुमारे ३० टक्के विक्री याच काळात होते. त्यामुळे कंपन्यांनी या सीझनसाठी विक्री युध्दाची रणनिती आखत आपापले सेल एकाच तारखेला जाहीर केले आहेत.

अॅमेझॉनने आपल्या सेलला दिवाळी सेल नाव दिले आहे. टेक्नो-सेव्ही ग्राहकांसाठी ही दिवाळी त्यामुळे जोरदार होणार आहे. या सेलमध्ये फॅशन, गृहपयोगी वस्तू, मोबाईल आणि अॅसेसीरीज, इलेक्ट्रोनिक्स आणि पुस्तके सामील आहे.

Leave a Comment