ब्लॅकबेरी आणणार पहिला अँडॉईड स्मार्टफोन

blackberry
नवी दिल्ली- ब्लॅकबेरी कंपनीचा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला पहिला अँड्रोईड स्मार्टफोन लवकरच दाखल होणार असून या स्मार्टफोनबद्दलची माहिती कंपनीच्या आधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. यामध्ये मोबाईलची किंमत आणि फिचर्सविषयी सांगण्यात आले आहे.

येत्या १६ नोव्हेंबरपासून भारतात ब्लॅकबेरीच्या पहिला अँड्रोईड स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होणार असून या स्मार्टफोनची किंमत ४८ हजार ८०० रुपये इतकी असून २३ ऑक्टोबरपासून काही देशांमध्ये या स्मार्टफोनची प्री बुकींग सुरू झाली आहे.

आपल्या पहिल्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये कंपनीने अनेक फिचर्स दिले असून हा स्मार्टफोन पुर्ण चार्ज केल्यानंतर २२ तास चालू राहू शकतो, असा कंपनीने दावा केला आहे. यामध्ये १८ मेगापिक्सल रेअर तर दोन मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.