पाच आजारांसाठी आता बालकांना फक्त एकच लस

baby
मुंबई – आतापर्यंत लहान वयात होणार्‍या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी एक वर्षापर्यंतच्या बालकाला तीन वेळा डोस देण्यासाठी सहा वेळा इंजेक्शनची सुई टोचावी लागत होती. पण आता मात्र पाच रोगप्रतिबंधकांचा समावेश असलेली ‘पेंटावॅलंट’ एकच लस देण्यात येणार असून ही लस येत्या नोव्हेंबरपासून देण्यात येणार आहे.

पूर्वीच्या चार ऐवजी पाच रोगप्रतिबंधकांचा या लसीत समावेश असणार असून घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, तसेच हिपॅटायटिस बी या आजारांच्या रोगप्रतिबंधक लसींचा पूर्वीच्या डोसेसमध्ये समावेश होता. आता त्यात ‘हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप बी’ या आजाराच्या प्रतिबंधक लसीचा नव्याने समावेश करण्यात आला असून ‘पेंटावॅलंट’ लस येत्या नोव्हेंबरपासून मोफतपणे प्रत्येक बालकाला दिली जाईल. राज्यात दर महिन्यात पावणेदोन लाख बालकाला ही लस देण्यात येणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment